दैवतीकरण आणि उदात्तीकरण हे हळव्या भावस्थितीचे मोठे आधार ठरतात. या दैवतीकरणाचे आणि उदात्तीकरणाचे उत्तराधिकारी म्हणविणारे अख्खा समाजच वेठीस धरू पाहताहेत.

देव हयात आहे, हे सांगायला कष्ट पडत नाहीत; पण देव नाही हे सांगायला मात्र आपल्याला आयुष्याची फार मोठी किंमत मोजावी लागते. आणि अनेकांनी ही किंमत मोजूनही आजतागायत आपण आपल्याभोवती फक्त देवत्वाचाच एल्गार ऐकत आलो आहे. देव ही  संकल्पना ज्याच्या त्याच्या मगदुरानुसार आकाराला आलेली असते हेही खरे आहे; पण ती पुढे ज्याच्या त्याच्या मगदुरानुसार न जाता कुणा एका शक्तीच्या मगदुरानुसार आकाराला येते.......